eSevas

जोपर्यंत मनुष्याला "आपले काही कर्तव्य आहे" अशी समजूत आहे, तोपर्यंत त्याने प्रयत्न अवश्यच केला पाहिजे, एरव्ही ठराविक गोष्टी साहजिक घडून येतातच. आपल्या इच्छेनुसार जर संसार चालला तर मग परमार्थाची किंमत कोणी मानिली नसती. संसार हा केव्हा विषम, केव्हा सम असा दिसत असणारच. त्यात आपण मात्र समत्व सोडता कामा नये. ओघप्राप्त कर्तव्य मोठ्या धैर्याने व चातुर्याने बजावीत, सहज स्थितीने प्रपंचात राहूनच, परमार्थप्राप्ती झाली पाहिजे.